झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या १३जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडून १ लाख ८२ हजार ७६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शहराजवळील तिसगाव शिवारात खवडा डोंगराच्या शेजारी शेतातील बांधकाम केलेल्या खोलीत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. एम वाळूज पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद केली. आरोपींमधील विष्णू लेखराज तनवाणी हा शिवसेनेच्या माजी आमदाराचा भाऊ आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. विष्णू लेखराज तनवाणी (वय ५०, गुलमंडी) हा नमूद ठिकाणी पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळून इतरांना खेळवत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार रात्री सव्वादहाच्या सुमारास छापा टाकला असता तनवाणीसह जगन्नाथ काशिनाथ औताडे (वय ५५, पंढरपूर, औरंगाबाद), सय्यद सत्तार सय्यद गफूर (वय ६५, रांजणगाव (शे.), औरंगाबाद), सुधीर पंडित जाधव (वय २८, बेगमपुरा), रमेश लक्ष्मण गायकवाड (५०, हर्सूल सांगवी), विठ्ठल उत्तमराव देशमुख (४१, शे. रांजणगाव), सुनील कचरू पंडुरे (४२, नारळीबाग), किशोर पंच्चूलाल लहरे (४२, शे. रांजणगाव), अनिल पंडित मेश्राम (३३, जयभवानी चौक, बजाजनगर), अजय दामोधर पाटील (३०, समर्थनगर), अजय रमेश जैन (३५, बेगमपुरा), विलास यादव बरुटे (३९, बजाजनगर) अशा १३जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ८२ हजार ७६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा