उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे रेल्वेगाडय़ांची गती मंदावली असून नागपूरला येणाऱ्या १४ रेल्वे गाडय़ा २ ते १५ तास विलंबाने धावत आहेत. गुरुवारी अचानक एका रेल्वे गाडीचे फलाट बदलल्याने रेल्वे प्रवाशांना धावपळ करीत दुसरे फलाट गाठण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला.
नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येण्याच्या पाच मिनिटापूर्वी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटानी फलाट बदलल्याची घोषणा झाली. वेळीच फलाट बदलल्याने सर्व प्रवाशांसह एका वृद्धालाही त्याच्या सामानासह एका फलाटावरून दुसऱ्याला फलाटावर जाण्यासाठी धावपळ करावी लागली. हा प्रकार गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस या गाडीत घडला. थंडीच्या कडाक्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचे चित्र गुरुवारी कायम होते. १२४१० निझामुद्दीन -राजयगड गोंडवाना एक्सप्रेस १५ तास विलंबाने धावत आहे. १२७२४ नवी दिल्ली हैद्राबाद ए पी एक्सप्रेस ७ तास, २२६९४ निझामुद्दीन बेंगळूर राजधानी एक्सप्रेस ५.३० तास, १६०३२ जम्मुतवी चेन्नई अंदमान एक्सप्रेस १२.३० तास. १२६१६ न्यू दिल्ली चेन्नई जी टी एक्सप्रेस ७ तास १२४०९ रायगड निझामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ११ तास, १२६२१ चेन्नई न्यू दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस ३ तास, १२६२२ नवी दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस ९ तास, १२७२३ हेद्राबाद नवी दिल्ली ए.पी एक्सप्रेस ४ तास, १२७२२ निझामुद्दीन हैदराबाद दक्षिण एक्सप्रेस ७ तास विलंबाने धावत आहे.  या शिवाय १२८५९ मुंबई (सीएसटी) हावडा गितांजली एक्सप्रेस ४.३० तास, १२६५० निझामुद्दीन यशवंतपूर संपर्कक्रांती एक्सप्रेस ३ तास, १२८८० भूवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनल सूपरफास्ट एक्सप्रेस ५ तास आणि १२६५२ हजरत निझामुद्दीन मदूराई संपर्कक्रांती एक्सप्रेस २ तास विलंबाने धावत आहे. गाडय़ा अनेक तास विलंबाने धावत असल्याने फलाटावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. सर्व प्रतिक्षालय हाऊसफुल्ल असल्याने प्रवाशी कडाक्याच्या थंडीत खाली बसले होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा