वर्धा जिल्हयात डेंग्यूची साथ पसरल्यानंतर १४० व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले. त्यापैकी २४ नमुने दूषित आढळले. जिल्हयात वर्धा-६, सेलू-१, देवळी-१, कारंजा-३, आर्वी-२,हिंगणघाट-९ व अशी रुग्णसंख्या आहे. आता साथीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केला आहे.
एकूण ५१ गावांमधे डेंग्यू व तत्सम साथीच्या आजाराने रुग्ण आढळून आले होते. अशा गावातील प्रत्येक घरी भेट देऊन रक्ताचे नमुने घेण्यात आले. ते पूणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. किटसंहारक फ वारणी झाली. प्रत्येक गावात डासांचे प्रमाण किती, याचेही प्रमाण काढण्यात आले.
जिल्हयातील प्रत्येक गावात नियंत्रण व प्रतिबंधात्मक योजना सुरू झाल्याचे आरोग्यविभागाचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी शेखर चन्न्ो यांनी नमूद केले की, सिंदी (रेल्वे) व सालई (कला) येथे आपण भेट दिल्यानंतर साथीच्या रोगांची स्थिती आटोक्यात आल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर आकस्मिक पथक तैनात ठेवून आरोग्य विभागाने साथींच्या रोगावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न पूरेपूरे केले असले तरी खाजगी रूग्णालयातही काही प्रमाणात रूग्ण दाखल झाले आहे. पावडे हॉस्पिटलमधे काही रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर झाल्यावर त्यास पूढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. कारण कुटुंबीयांनी डेग्यूविषयी घेतलेली धास्ती हेच त्यामागचे कारण दिले जाते. अन्य रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. खाजगी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची दखल घेतल्या जात आहे. तो बरा होउन घरी गेल्यानंतर त्याच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करण्याचे काम आरोग्य खातेच करीत असल्याचे अधिकारी सांगतात. पण शासकीय आरोग्ययंत्रणेपेक्षा खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही दिसून येते. यामागे यश चोप्रांचा डेंग्यूने झालेला मृत्यू हेच कारण असल्याचेही लपून राहलेले नाही. डेंग्यू गरीब-श्रीमंत असा भेदाभेद करीत नसल्याने सामांन्यांना परवडणारी शासकीय रूग्णालय आणि महागडी खाजगी रूग्णालये, अशा दोन्ही उपचारकें द्रात डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा