जिल्ह्य़ात आजपर्यंत अपेक्षित तुलनेत सरासरी १४२ टक्के पाऊस झाला. असे असले, तरी जिल्ह्य़ातील ७ मध्यम सिंचन प्रकल्प व ५७ लघुसिंचन प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठय़ाचे प्रमाण मात्र सरासरी २० टक्केच आहे.
जिल्ह्य़ात आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे आतापर्यंतच्या अपेक्षित तुलनेत १४२ टक्के पाऊस जाफराबाद तालुक्यात झाला. या तालुक्याने वार्षिक अपेक्षित पावसाची सरासरी (१०३.७६ टक्के) ओलांडली. बदनापूर व घनसावंगी वगळता अन्य सर्वच तालुक्यांनी अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली. जिल्ह्य़ात आजपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस, सर्व आकडे मिमीमध्ये – जालना ५९३.२५, बदनापूर ३८१.६०, भोकरदन ४५२.८८, जाफराबाद ६५२.२०, परतूर ५८२.२०, मंठा ५९५.७५, अंबड ४५७.५७ व घनसावंगी २९८.५१. जिल्ह्य़ातील पावसाची आतापर्यंतची सरासरी ४९६.७७ आहे. जिल्ह्य़ातील सात मध्यम प्रकल्पांत आजपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा २१ टक्के आहे. पैकी कल्याण गिरजा ५७ टक्के, जुई ४५, धामना ४१, जीवरेखा २१, गल्टाटी १४ टक्के याप्रमाणे उपयुक्त साठा आहे. कल्याण मध्यम व अप्पर दूधना प्रकल्पांमध्ये अजून एक टक्काही उपयुक्त साठा झाला नाही. मागील वर्षी या वेळेपर्यंत सातही मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा दोन टक्केच होता.
जिल्ह्य़ातील एकूण ५७ लघु सिंचन प्रकल्पांत आजपर्यंत २० टक्के उपयुक्त जलसाठा झाला. मागील वर्षी या काळापर्यंत हा साठा १.२६ टक्के एवढाच होता. अजूनही ६ लघुसिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. ३७ लघुसिंचन प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्य़ांच्या आत आहे. २५ ते ५० टक्क्य़ांदरम्यान जलसाठा असलेल्या लघुसिंचन प्रकल्पांची संख्या केवळ तीन आहे. एकच लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. पिंपळवाडी साठवण तलाव, तसेच कोनड, भारन, ढोलखेडा, शिंदी, ढोकसाळ, पांगरी, पिंपरखेडा, दहा, वाई हे लघुप्रकल्प पूर्ण भरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा