सेवाकर बुडव्यांना कारवाईतून अभय देण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वेच्छिक अनुपालन प्रोत्साहन योजनेत (व्हीसीईएस-२०१३) व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आत्तापर्यंत ११८ व्यापाऱ्यांनी डिक्लरेशन फाईल केले आहे. त्यातून १५ कोटी रुपयांच्या सेवाकराचे उत्पन्न प्राप्त झाले. ही योजना ३१ डिसेंबरर्प्यत सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय उत्पादन, सेवाशुल्क व सेवाकर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
दि. १ ऑक्टोबर २००६ ते ३१ डिसेंबर २०१२ दरम्यान ज्यांनी सेवाकराचा भरणा केला नाही किंवा कमी केला तसेच भरणा करणे राहून गेले अशा व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे. त्यानुसार ३१ डिसेंबपर्यंत भरणा करणाऱ्यांच्या व्याजात ५० टक्के सूट व दंड आकारणी केली जाणार नाही तसेच उर्वरित ५० टक्के रक्कम १ जानेवारी ते जून २०१४ पर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर मात्र व्याज व दंड आकारणी केली जाणार आहे.
या योजनेसाठी आयुक्त कुमार संतोष (औरंगाबाद) यांच्या उपस्थितीत नगरमध्ये व्यापाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी आयुक्त संतोष यांनी व्यापारी योजनेस सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त दिनेश पांगारकर यांनी योजनेसंदर्भात सादरीकरण केले. या वेळी औद्योगिक व सेवा देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, बांधकाम, हॉटेल व्यावसायिक असे सुमारे दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Story img Loader