ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत पूर्ण होणाऱ्या शिरपूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण व प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नांथे गावचे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने पाच वर्षांनंतर या गावाला सरपंच लाभणार आहे.
शिरपूर तालुक्यातील नांथे येथील सरपंचपद इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. या पदासाठी पात्र असा एकही उमेदवार नसल्याने २००८ च्या निवडणुकीत ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून आरक्षण बदलाची मागणी केली होती. अगदी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही तेथील सरपंचपद रिक्त राहिले होते. यंदा मात्र सरपंचपदाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. तहसीलदार नितीन पाटील यांनी जाहीर केलेले आरक्षण पुढीलप्रमाणे- उंटावद- इतर मागास महिला, कुरखळी- सर्वसाधारण महिला, अंतुर्ली- अनुसूचित जमाती महिला, उमर्दा-अनुसूचित जाती महिला, नांथे- सर्वसाधारण, खामखेडा – सर्वसाधारण, लोंढरे- अनुसूचित जमाती महिला, आमोदे- सर्वसाधारण महिला, ताजपुरी- अनुसूचित जाती महिला, तरडी- सर्वसाधारण महिला, धाडे- सर्वसाधारण, टेंभेपाडा- अनुसूचित जमाती, खुर्दे बुद्रुक- इतर मागास, बभळाण- सर्वसाधारण महिला असे आहे.

Story img Loader