वनविकास महामंडळाने मागील पाच वर्षांत विविध वस्तूंच्या लिलावातून १६४ कोटी ८१ लाखाचा महसूल गोळा केला, तर ३२ लाख ७५ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून दिला.
महामंडळाने या जिल्ह्य़ातील उत्तर चांदा प्रदेशांतर्गत पश्चिम चांदा, मध्य चांदा व ब्रम्हपुरी, असे वनविकास महामंडळाचे तीन वनप्रकल्प विभाग आहेत. प्रदेशाचे एकूण क्षेत्र ८८ हजार हेक्टर असून पश्चिम चांदा वनप्रकल्पाचे क्षेत्र ३६ हजार ४८०, मध्य चांदा प्रकल्पाचे क्षेत्र ३१ हजार १३४, तर ब्रह्मपुरी वनप्रकल्पाचे एकूण क्षेत्र २० हजार ४१५ हेक्टर क्षेत्र आहे. या तीनही प्रकल्पांतर्गत वनविकास महामंडळाने रोपवने विकसित केली असून साग रोपवन व मिश्र रोपवनाचा यात समावेश आहे. २०१० च्या पावसाळ्यात ८१४ हेक्टर, २०११ मध्ये ९३३ हेक्टर व २०१२ च्या पावसाळ्यात ८७३ हेक्टर रोपवने विविध योजनेंतर्गत विकसित केली आहेत. वनविकास महामंडळांतर्गत विविध विकास कामे व रोपवन करण्यात येतात. या अंतर्गत निष्कासन, रोपवने टर्नकी अंतर्गत वेकोलि, कर्नाटक एम्टा व भद्रावती आयुध निर्माणी चांदा क्षेत्रात रोपवन, तसेच आधुनिक वणवा प्रतिबंधक प्रकल्पांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रात आग प्रतिबंधकात्मक कामे, निसर्ग पर्यटन, वन्यजीव व्यवस्थापनाची कामे मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. इमारत, फाटे, बिट, बांबू, चपाटी व बांबू बंडल्स यासारख्या विविध वस्तूंच्या निष्कासनांतर्गत मागील पाच वर्षांत महामंडळाला १६४.८१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
महामंडळाच्या वतीने लोहारा व झरन येथे रोपवाटिका तयार केली असून त्यात उत्कृष्ट प्रतीच्या साग जडय़ा तयार करण्यात येतात. २०१२ मध्ये साग जडी, रूट ट्रेनर रोपे व पॉलीपॉट रोपे, अशी २३ लाख ३१ हजार रोपे तयार करण्यात आली, तर २०१३ च्या पावसाळ्यात १६०० हेक्टरवर साग रोपवन, बांबू रोपवन व इतर रोपवन करण्यात येणार असून येत्या पावसाळ्यात २७ लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठरविले आहे.
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ६३ नैसर्गिक पाणवठे असून तेराव्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून महामंडळाने वन्यजीव व्यवस्थापनांतर्गत ३६ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. निसर्ग पर्यटनांतर्गत पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधांसह कोलारा व मोहुर्ली येथे संकुल तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना संकुलाच्या आरक्षणाची संकेतस्थळावर सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दोन्ही संकुलांमध्ये निसर्ग पाऊलवाटांची उत्तम आखणी केली असून ती इको-फेंड्रली सायनेजेसनी सुसज्ज आहे. प्रशिक्षित गाईडमार्फत निसर्ग पाऊलवाटा भ्रमंतीकरिता अतिशय उपयुक्त आहेत. ही संकुले रेनवॉटर हार्वेस्टिंग, अॅडव्हेंचर स्पोटर्स आदी स्थानिक एनजीओ मार्गदर्शनाखाली उभारल्या आहेत. निसर्ग पर्यटन संकुल मोहुर्ली येथे ४ कॉटेजेस व ४० बेड डॉरमेटरीची व्यवस्था आहे. निसर्ग पर्यटन संकुल, कोलारा येथे ५ कॉटेजेस व ३२ बेड डॉरमेटरीची व्यवस्था आहेत. प्रत्येक कॉटेजेसमध्ये २ व्यक्तीची राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा