कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी शेडय़ूल्ड बँकेची आíथक घौडदौड गतवर्षांतही कायम राहिली आहे. बँकेने १८३३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून, १४ कोटी ६९ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये ३८ शाखा कार्यरत असून आणखी ५ शाखा या वर्षांत सुरू करण्याचा संकल्प आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या सन २०१२-१३ सालच्या आíथक प्रगतीची माहिती देताना सौंदत्तीकर म्हणाले, बँकेच्या ठेवींनी ११०० कोटींचा टप्पा ओलांडला असून कर्जे ७३३ कोटींवर पोहोचली आहेत. ढोबळ एनपीएचे प्रमाण ४ टक्के असून निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.५७ टक्के आहे. रिझव्र्ह बँकेने नवमहाराष्ट्र सूतगिरणी, लठ्ठे सोसायटी, सांगली व नृसिंहवाडी येथे ऑफ साईट एटीएम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बेळगाव, बंगलोर,
बँकेने ९०० महिला बचतगटांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी ३ कोटी रुपयेपर्यंत अर्थसाहाय्य केले आहे. केंद्र शासनाच्या फायनान्शियल इन्क्लूजनसारख्या धोरणांची पूर्तता केली आहे. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत उत्कृष्ट अर्बन बँक म्हणून १ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. गुणवत्तापूर्ण कार्यशैलीमुळे बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेस आयएसओ-९००१-२००८ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून इचलकरंजी शहर व परिसरात सुमारे ५० लाख रुपये खर्च करून ५ ठिकाणी शुद्ध जल प्रकल्पांची उभारणी केली आहे. या उपक्रमास ग्लोबल सीएसआर संस्थेने पुरस्कार देऊन बँकेचा सन्मान केला आहे. शहापूरमध्ये नवा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
केंद्र शासनाच्या विविध अनुदानांचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी बँकेच्या वतीने आधार अनुदानकार्ड योजना सुरू करण्यात येणार आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन मिळते. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. कुंभार, संचालक अधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा