प्राध्यापकाच्या मोटारसायकलची डिकी उघडून चोरटय़ाने अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदुपारी वर्दळीच्या ठिकाणी घडली. अवघ्या काही मिनिटात चोरटय़ांनी संधी साधून ही चोरी केल्याचे दिसून आले.
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील महाविद्यालयातील प्रा. हणमंत शिवाजी लवटे (रा. रुबीनगर, जुळे सोलापूर) यांनी दुपारी पावणेएकच्या सुमारास डफरिन चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियातून चार लाख ७० हजारांची रक्कम काढली. सत्तर हजारांची रक्कम पत्नीला देऊन घरी पाठविले व एका शिक्षक मित्राला काही रक्कम दिली. त्यानंतर प्रा. लवटे हे आपल्या मुलासह मोटारसायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले. मित्राकडून घेतलेली रक्कम परत देण्यासाठी ते तेथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिध्देश्वर प्रशालेजवळ एका रसपानगृहात मित्र पांडुरंग परळकर यांच्यासोबत प्रा. लवटे हे बोलत थांबले असता रसपानगृहासमोर लावलेल्या मोटारसायकलची डिकी अज्ञात चोरटय़ाने उघडून अडीच लाखांची रक्कम चोरून नेली. एका १५ वर्षांच्या मुलाने सदर मोटारसायकलची डिकी चावीने उघडताना व त्यातील रक्कम घेऊन जाताना काहीजणांनी पाहिल्याचे निदर्शनास आले. परंतु आरडाओरड करेपर्यंत मुलगा पसार झाला. सदर बझार पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा