दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी २० छात्रसैनिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पथक नुकतेच दिल्लीला रवाना झाले. या पथकाच्या काँटिजन्ट कमांडर म्हणून सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा काम पाहात आहेत. विशेष म्हणजे या वर्षी या पथकातील सर्व छात्रसैनिक हे कोल्हापूर गट मुख्यालयाच्या अखत्यारित असलेल्या बटालियन्सचे आहेत.
    राज्यभरातील विविध गट मुख्यालयांच्या ज्या स्पर्धा औरंगाबाद येथे झाल्या त्या स्पर्धामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात संग्राम भालकर यांनी बसविलेल्या कोल्हापूर गट मुख्यालयाच्या छात्रसैनिकांच्या पथकाचा कार्यक्रम सर्वात उजवा ठरल्याने या पथकाची निवड दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरातील स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी करण्यात आली.     
दिल्लीला रवाना झालेल्या पथकातील विद्यार्थ्यांमध्ये आनंद अशोक कांबळे (सांगली), शुभम जोशी, नितीन कांबळे, गोमटेश मस्के, शुभम महाडिक, ओंकार भट, उदयराज कदम, अक्षय कांबळे, जगदीश पोवार, धीरज निने (सर्व कोल्हापूर). तर मुलींमध्ये अनुजा माने, मृणालिनी मुदगल, दिव्या माळी, पूजा पाटील, पूजा पवार, चेतना पाटील, शीतल कमलाकर (सर्व कोल्हापूर), मीनल चौगुले (सांगली), दीक्षा नंदा (चिपळूण), वैशाली शिंदे (वारणानगर) यांचा समावेश आहे. तर छात्रसैनिकांच्या या पथकाबरोबर हवालदार प्रदीप गोसाई हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.

Story img Loader