सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसात वादळी वाऱ्यामुळे शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका प्रशालेच्या वर्गावरील पन्हाळी पत्रे उडाल्याने त्यात २० विद्यार्थी जखमी झाले. जखमींपकी तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
एमआयडीसी भागातील कुंभारी विडी घरकुल रस्त्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना सायंकाळी या प्रशालेतील वर्ग चालू होते. परंतु वादळामुळे वर्गावरील पन्हाळीपत्रे उडून विद्यार्थ्यांवर कोसळले. यात दुखापत झालेल्या २० विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालय व नजीकच्या लोकमंगल – जीवक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर मदत पथके धावून आली. मदत कार्य सुरू असताना पावसाचा अडथळा येत होता.

Story img Loader