डोंबिवली नागरी सहकारी बँकेने दुष्काळग्रस्तांसाठी २१ लाख रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे. यामधील काही निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधी, प्रत्यक्ष दुष्काळी भागात कार्यरत असणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी-अंबेजोगाई, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, औरंगाबाद, रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्याकडे काही निधी सुपूर्द करण्यात आला आहे.
बँकेचे संचालक प्रा. उदय कर्वे व सुहास कुलकर्णी यांनी दुष्काळी भागाचा दौरा करून तेथील संस्थांची कामाची पाहणी करून हा निधी वाटप करण्यात आला आहे. बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँकेचा धर्मादाय निधी, संचालकांच्या व्यक्तिगत मदतीमधून हा निधी संकलित करण्यात आला आहे, असे अध्यक्षा नंदिनी कुलकर्णी यांनी सांगितले. या निमित्ताने बँक परिवाराला दुष्काळ निवारणाच्या कामात सहभागी होता आले. दुष्काळ निवारणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची कोणाला माहिती पाहिजे असेल त्यांनी बँकेचे सचिवालय, २८७५०१६ येथे संपर्क करावा.