जिल्हय़ातील पक्षी महागणनेचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. ६७ ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत ८० प्रजातींचे २२ हजार ९१४ पक्षांची त्यात गणना झाली आहे. त्यात २ हजार ४८१ चिमण्यांची नोंद करण्यात आली. जिल्हय़ात भोरडय़ा पक्षी सर्वाधिक असून त्यांची संख्या ९ हजार ३८१ आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार पक्षांची नोंद झाली.
कापशी, कवडय़ा धीवर, गरुड, श्यामा, ठिपकेवाला, कवडा, पाणकावळा, ग्रे हेरॉन, काळा शराटी, करकोचा, नाचण, धोबी असे वेगळे पक्षीही जिल्हय़ात आढळून आले. ११ ते २६ जानेवारी दरम्यान जिल्हय़ात ही महागणना झाली. त्यासाठी ६७ केंद्रे ठेवण्यात आली होती. दहा तालुक्यांतील १८ निरीक्षकांसह १८० विद्यार्थी या गणनेत सहभागी झाले होते. तिसगाव प्राथमिक शाळेतील शिक्षक तथा महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे सभासद जयराम सातपुते यांनी नुकतीच जिल्हय़ाची आकडेवारी संकलित केली आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४६ ठिकाणी पक्षिगणना झाली. त्यात ८ निरीक्षक व १०२ विद्यार्थी सहभागी झाले होते. हृषीकेश गावडे, महेश फलके, विकास सातपुते, स्नेहा ढाकणे, चंद्रकांत उदागे, देवेंद्र अंबेटकर, अनमोल होन, सचिन परदेशी, विजयकुमार राऊत, गोकुळ नेहे, शिवकुमार वाघुंबरे, रामेश्वर लोटके, विजय बोरुडे, रावसाहेब गाडे व वाजिद सय्यद हे पक्षिनिरीक्षक या गणनेत सहभागी झाले होते.
जिल्हय़ातील दहा तालुक्यांमध्ये कमीअधिक ठिकाणे निवडून तेथे पक्षिगणना करण्यात आली. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कोपरगाव- १ हजार २२६ पक्षी (३२४ चिमण्या, २१७ कावळे), राहाता- २४६ पक्षी (२० चिमण्या, ५८ कावळे), संगमनेर- २८६ पक्षी (४ चिमण्या, २५ कावळे), कर्जत- १० हजार ८० पक्षी (२८ चिमण्या, ५५ कावळे, ९ हजार भोरडय़ा), अकोले- ७३१ पक्षी (१०० चिमण्या, २५० कावळे), नगर- ९४५ पक्षी (१३३ चिमण्या, १०८ कावळे), श्रीगोंदे- ४८२ पक्षी (११० चिमण्या, ९१ कावळे), शेवगाव- ४२४ पक्षी, पाथर्डी- ८ हजार ३१४ पक्षी (१ हजार ७४७ चिमण्या, १ हजार ३०७ कावळे) आणि नेवासे- १८० पक्षी (१५ चिमण्या, २० कावळे). 

Story img Loader