शेतकऱ्यांच्या हितासाठी अन् शेतात वाळून चाललेला ऊस, दुष्काळ यामुळे अन् उस दराच्या आंदोलनामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. याकरिता विठ्ठल सहकारी साखर कारखाना २३२५ रुपये पहिला हप्ता देणार आहे, असे आमदार कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘विठ्ठल’ कारखान्याने आपला पहिला हप्ता २३०० रुपये जाहीर केल्यानंतर लगेचच पांडुरंग कारखान्याने आपला दर पंचवीस रुपयांनी वाढवून जाहीर केला आहे.
जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा करून २१०० रुपये दर देण्याचे ठरले. त्यातही कारखान्याने ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा असेही ठरले. त्यानुसार संचालक मंडळ, कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा करून २३२५ रु. दर द्यावा असे ठरले. त्याप्रमाणे भालकेंनी दर जाहीर केला.
ठाकरे यांना श्रद्धांजली
एक कणखर नेता, वाघाची झेप असलेला, वाघाप्रमाणेच जगणारा नेता गेला ही पोकळी भरून येणार नाही. मी २००४ साली निवडणुकीसाठी बाळासाहेबांकडे ए. बी. फॉर्म आणायला गेलो होतो तेव्हा मी एक सभा त्यांनी घ्यावी असे सुचवले तेव्हा बाळासाहेब म्हणाले, तब्बेत बरी नसते. बघू, तू वाघ आहेस. वाघाच्या सभेला वाघाने काय येण्याची गरज आहे, असे सांगितले.
त्याच्या जाण्याने मुंबई फार पोरकी झाली आहे. त्यांच्या दु:खात मतदारसंघ आहे, अशी पंढरपूर मंगळवेढा आमदार भारत भालके यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘पांडुरंग’तर्फे २३०० रुपये
गेले महिनाभर चालू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाची कोंडी पांडुरंग साखर कारखान्याचे मार्गदर्शक जेष्ठ नेते सुधाकर परिचारक यांनी फोडून ‘पांडुरंग’चा पहिला हप्ता २३०० रुपये जाहीर केला आहे.
परिचारक यांनी शनिवारी दुपारी त्यांच्या वाडय़ावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले, नितीन बागल, नाईकनवरे यांच्यासह ‘पांडुरंग’चे अध्यक्ष दिनकर मोरे, कार्यकारी संचालक के. एन.
निंबे, दिलीप चव्हाण, सुरेश आगावणे, किसान सभेचे हरीष गायकवाड यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर सुमारे दीड ते दोन तास चर्चा खा. राजू शेट्टी यांच्याबरोबर करून शेतकऱ्यांचे नुकसान, दुष्काळ, शेतात वाळून चाललेला ऊस याचा विचार करावा व शेवटी तोडगा निघून पांडुरंग कारखान्याच्यावतीने २ हजार ३०० रुपयांचा  पहिला हप्ता देण्याचे मान्य केले. तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करून जिल्ह्य़ातील इतर कारखान्यांनी जास्त दर द्यावा, असे ही त्यांनी आवाहन केले.
तसेच पांडुरंग कारखान्याच्या गाडय़ा अडवू नये, असे आवाहन दीपक भोसले यांनी केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा