सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी वगळता उर्वरित सर्व दहा तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी २३७ चारा छावण्या सुरू आहेत. या चारा छावण्यांमध्ये एक लाख ९२ हजार ५५९ जनावरे दाखल आहेत. येत्या काही दिवसात जनावरांची संख्या दोन लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या चारा छावण्यांवर आतापर्यंत १४६ कोटी २६ लाख २७ हजारांचा खर्च झाला आहे.
सर्वाधिक ९३ चारा छावण्या अर्थात सांगोला तालुक्यात असून त्याठिकाणी तब्बल एक लाख ६४०४ जनावरे आहेत. तर मंगळवेढा तालुक्यात ६४ चारा छावण्या असून त्यातील जनावरांची संख्या ३१ हजार ९८४ एवढी आहे. मंगळवेढय़ाच्या खालोखाल माढा तालुक्यात २८ चारा छावण्या आहेत. त्याठिकाणी १७ हजार ७४४ जनावरांची व्यवस्था केली जात आहे, तर मोहोळ तालुक्यातही १७ हजार २९७ जनावरांची देखभाल २९ छावण्यांमध्ये केली जात आहे.
करमाळा तालुक्यातील चारा छावण्यांची संख्या ११ एवढी आहे. तेथे ९३१२ जनावरांना चारा उपलब्ध करण्यात आला आहे. माळशिरस तालक्यात चार छावण्या असून तेथे ४५०४ जनावरे आहेत, तर पंढरपूर तालुक्यात चारा छावण्यांची संख्या तीन आहे. त्याठिकाणी ३७३६ जनावरे आहेत. उत्तर सोलापुरात दोन छावण्यांमध्ये ६३३ तर दक्षिण सोलापुरात दोन छावण्यांमध्ये ४०१ जनावरे दाखल आहेत. अक्कलकोट तालुक्यात केवळ एक चारा छावणी सुरू असून तेथील जनावरांची संख्या ५४४ इतकी आहे.

Story img Loader