वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध ‘महावितरण’ ने सुरू केलेल्या मोहिमेत एका माहिन्यामध्ये तब्बल ९१ हजार वीजजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यातील ७० हजार २७४ थकबाकीदारांकडून २४ कोटी १२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
थकबाकीदारांविरुद्धची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे ‘महावितरण’ कडून स्पष्ट करण्यात आले. थकबाकी असलेल्या ग्राहकांचे वीजजोड खंडित
करताना मीटर व सव्‍‌र्हिस वायरही काढून घेतले जाणार
आहे.
थकबाकी व पुनजरेडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नाही, असेही ‘महावितरण’ कडून कळविण्यात आले आहे.
पुणे, िपपरी-चिंचवड शहरांसह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागात डिसेंबर महिन्यामध्ये थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ९१ हजार ५०५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्याकडे ३५ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील २४ कोटी १२ लाखांची वसुली झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा