आषाढी एकादशीचे सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीत वारकरी, भाविक यांची वर्दळ वाढू लागली असून येणाऱ्या वारकऱ्यास विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे या करता मंदिर समितीने कालपासून (बुधवार) २४ तास दर्शनाची सोय केली आहे.
आळंदी-देहू येथून निघालेल्या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरापासून काही कि.मी. अंतरावर आल्याने वारक ऱ्यांना विठ्ठल दर्शनाचा ओढा लागला असल्याने पालखी मुक्कामी विसावताच अनेक वारकरी, हे विठ्ठल दर्शनास येतात. त्यांना त्वरित दर्शन घडावे या करिता २४ तास विठ्ठल- रुक्मिणी दर्शन सोय केली असून ही सोय सुमारे १५ दिवस राहणार आहे, असे कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी सांगितले.
वारीत ही ऑनलाइन दर्शन सोय केल्याने या दर्शनासाठी २० हजार भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केले आहे. कालपासून २४ तास दर्शन सोय केल्याने विठ्ठलाच्या पाद्यपूजा, तुळसी अर्चन आदी बंद असून हे सर्व प्रक्षाळ पूजेनंतर चालू होणार आहे. येणाऱ्या भक्त वारकरी यांचे सोयीकरिता विठ्ठल मंदिर समिती सज्ज झाली आहे.

Story img Loader