जैववैद्यकीय कचरा टाकल्याने नोटीस

धंतोलीतील स्पंदन रुग्णालयाने साठवून ठेवलेला जैववैद्यकीय कचरा रुग्णालयाजवळील महापालिकेच्या कचऱ्यामध्ये टाकल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला.
शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयाची संख्या बघता रुग्णालयात जमा होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने भांडेवाडीमध्ये व्यवस्था केली असताना शहरातील अनेक रुग्णालये महापालिकेच्या कचराघरात या कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या विरोधात विशेष मोहीम राबवून रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याची सूचना केली होती. त्यानंतरही अनेक खाजगी रुग्णालयांनी महापालिकेचा आदेश वेशीवर टांगला आहे. आज सकाळी स्पंदन रुग्णालयाने महापालिकेच्या कचरा पेटीमध्ये जैववैद्यकीय कचरा टाकल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला नोटीस देत २५ हजार रुपये दंड ठोठावला. स्पंदन रुग्णालय डॉ.  मार्डीकर यांचे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रुग्णालयावर कारवाई करून त्यांना नोटीस दिली.
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अशोक उरकुडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी भिवापूरकर यांनी ही कारवाई केली.       

Story img Loader