गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत महापालिकेने पथनाटय़ाद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरात २८२ सोनोग्राफी सेंटर्स नोंदणीकृत असून सर्व केंद्रांवर लक्ष दिले जात आहे. लिंग निदान करून गर्भपात केल्याचे लक्षात आल्यास केंद्रावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील परिचारिकांची कार्यशाळा नुकतीच झाली.
या मोहिमेची सुरुवात महापालिकेच्या ‘पीसीपीएनडीटी’च्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी केली. मुलगा-मुलगी समानता आता यायला लागली असली तरी अजूनही पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही. रुग्णालयातील परिचारिकांनी त्यांच्या परिसरातील रुग्णालयात वारंवार भेटी द्यायला हव्या, असे डॉ. सोनकुसळे म्हणाल्या. सोनोग्राफी केव्हा करावी?, एखादी गरोदर महिला गर्भपात तर करीत नाही? यावर लक्ष ठेवावे, याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम यांनी विचार व्यक्त केले. महापालिकेचे अभियोक्ता व्यंकटेश कपले यांनी पीसीपीएनडीटी कायद्याबाबत माहिती दिली. या वेळी व्यवहार व न्याय अभियोक्ता प्रकाश बरडे, सूरज पारोचे, व्यवहार न्याय अभियोक्ता कल्पना वानखेड, प्रदीप कुंभारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनकुसळे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
उपराजधानीत अवघी २८२ सोनोग्राफी केंद्रे नोंदणीकृत
गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत महापालिकेने पथनाटय़ाद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरात २८२ सोनोग्राफी सेंटर्स नोंदणीकृत असून सर्व केंद्रांवर लक्ष दिले जात आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-04-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 282 sonography center authorised in nagpur