महिला व बालविकास विभागातील निवासी संस्थेतील मुलामुलींचे शासकीय चाचा नेहरू बालमहोत्सव कार्यक्रम उद्या प्रजासत्ताकदिनापासून तीन दिवस सुरू राहणार आहेत. कागल येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या डी. एड. कॉलेजच्या प्रांगणात याचे आयोजन केले आहे. प्रजासत्ताकदिनी व जिल्हा व सत्रन्यायाधीश वी. रा. लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर २८ जानेवारीला सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. बालमहोत्सवात सुमारे १ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय माने यांनी सांगितले.२े