शहरातील विजापूर रस्त्यावर नवीन आरटीओ कार्यालयाजवळ ज्ञानसंपदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या २७, २८ व २९ जानेवारी रोजी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधा अळ्ळीमोरे या योग प्रशिक्षण देणार आहेत.
हे शिबिर दररोज पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० पर्यंत चालणार आहे. २७ जानेवारी रोजी या शिबिराचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. हे शिबिर सर्व वयोगटांसाठी खुले असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक कपिलदेव कोळी यांनी केले आहे
सोलापुरात तीनदिवसीय योग प्रशिक्षण शिबिर
शहरातील विजापूर रस्त्यावर नवीन आरटीओ कार्यालयाजवळ ज्ञानसंपदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या २७, २८ व २९ जानेवारी रोजी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधा अळ्ळीमोरे या योग प्रशिक्षण देणार आहेत.
First published on: 25-01-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 days yoga training camp in solapur