झाडाला मोटारीची धडक बसून त्यातील प्रवास करणारे नांदेड जिल्ह्यातील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात करंजी (ता.राधानगरी) येथे शनिवारी दुपारी तीन वाजता झाला.
या अपघातात संतोष पाटील, अमर पोवार, विक्रम राठोड (सर्वाचे वय ३० रा.देवताळा, जि.नांदेड) हे जखमी झाले.    नांदेड येथील हे युवक गोव्याला गेले होते. तेथून ते सकाळी परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. करंजी गावाजवळ आले असता त्यांची इनोव्हा मोटार चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेच्या झाडाला धडकली. त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. प्रारंभी त्यांच्यावर राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये गाडीचे (ए.एच.२६-ए.एफ.२३३१) मोठे नुकसान झाले. अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Story img Loader