येथील युसूफ कॉलनीत पोलिसांनी ३ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा शनिवारी ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली.
शुक्रवारी रात्री माहिती मिळाल्यानुसार युसूफ कॉलनी येथे वाहनातून (एमएच २३ डब्ल्यू ८८६) म. कलीम म. युसूफ हा गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वाहनासह त्याला पकडले. त्याच्याकडे ११ मोठय़ा पांढऱ्या बॅग आढळून आल्या. या बॅगमध्ये १ हजार गुटख्याचे पॅकबंद पुडे सापडले. ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचा हा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader