उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त सी. आर. रोडे, पोलीस निरीक्षक काळूराम धांडेकर व पोलीस नाईक इब्राहिम पटेल यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्रदिनी या सन्मानचिन्हाचे वितरण होणार आहे.
सहायक पोलीस आयुक्त रोडे हे १९८३ साली पोलीस खात्यात फौजदार म्हणून दाखल झाले. नंतर पदोन्नती मिळत गेली व २०१० साली ते सहायक पोलीस आयुक्त म्हणून सोलापूर शहरात रुजू झाले. तर पोलीस निरीक्षक धांडेकर हे १९८२ साली पोलीस खात्यात रुजू झाले. १९८२ साली ते फौजदार तर २००९ साली ते पोलीस निरीक्षक झाले. या पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी पोलीस खात्यात उल्लेखनीय सेवा केल्याने त्याची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस नाईक पटेल यांची सेवा गुणवत्तापूर्ण असून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनाही या सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा