लातूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत २०१३-१४ च्या वार्षिक ३२० कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांनी महापालिकेचे २०९ कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक मागील बैठकीत स्थायी समितीसमोर सादर केले होते.
स्थायीचे सभापती, सदस्य विक्रमसिंह चौहान, लक्ष्मण कांबळे, अॅड. किशोर राजुरे, नरेंद्र अग्रवाल, अॅड. दीपक सूळ, गिरीश पाटील, पप्पू गायकवाड, राजा मणियार, चंद्रकांत चिकटे, छाया चिंदे, शशीकला यादव आदी या वेळी उपस्थित होते. मनपातील प्रत्येक विभागाची बैठक घेऊन त्या त्या विभागाच्या महसूल खर्चात वाढ करण्यात आली. स्थायीने केलेल्या दुरुस्तीमुळे अंदाजपत्रकात १११ कोटींची भर पडून ३२० कोटींच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने मान्यता दिली. अंदाजपत्रकावर निर्णयासाठी येत्या मंगळवारी (दि. ३०) मनपात सभा होणार आहे.
लातूर मनपाचे ३२० कोटींचे अंदाजपत्रक
लातूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत २०१३-१४ च्या वार्षिक ३२० कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांनी महापालिकेचे २०९ कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक मागील बैठकीत स्थायी समितीसमोर सादर केले होते.
First published on: 28-04-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 320 budget of latur municipal corporation