जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार ३ ते ५ ऑक्टोबर २०११ मध्ये शाळांची पटपडताळणी मोहिमेअंतर्गत ज्या शाळांची पटसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा ३६ शाळा असून त्यांची मान्यता ३० एप्रिल २०१३ पासून काढून टाकण्यात आली आहे. अशा शाळांमध्ये पालकांनी मुलांना प्रवेश देऊ नये, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांनी आवाहन केले आहे.
अशा ५० टक्क्यांपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये पुढील शाळांचा समावेश आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे प्राथमिक शाळा गवळीपुरा कामठी, राष्ट्रीय उर्दू प्राथमिक शाळा, इतवारी, सरस्वती प्राथमिक शाळा वर्धारोड, आदर्श उच्च प्राथमिक शाळा पठाण लेआऊट, श्री महावीर गुजराती प्राथमिक शाळा संत्रा मार्केट, कुर्वेज न्यू मॉडेल प्राथमिक शाळा, दुर्गानगर, आर्य उच्च प्राथमिक शाळा दुर्गानगर,, भारतीय उच्च प्राथमिक शाळा भगवाननगर, प्रगती प्राथमिक शाळा नरेंद्रनगर, सर्वश्री प्राथमिक शाळा सर्वश्रीनगर, राधेश्याम प्राथमिक शाळा तांडापेठ, शम्स उर्दू प्राथमिक वांजरा लेआऊट, नूर उर्दू प्राथमिक शाळा दर्शन टॉवर नागपूर, इंदिरा उच्च प्राथमिक शाळा कुही, प्रज्ञापीठ प्राथमिक शाळा कामठी, देवराव कामळे प्राथमिक शाळा कामठी यांचा समावेश आहे. मान्यता काढण्यात आलेल्या विनाअनुदानित शाळा पाच आहे. त्यात मातोश्री वंजारी प्राथमिक शाळा कुही, खोब्रागडे प्राथमिक शाळा कामठी, अंबा प्राथमिक शाळा दुपारे लेआऊट, खोब्रागडे प्राथमिक शाळा हुडको कॉलनी, भारतरत्न प्राथमिक शाळा वैशालीनगर, या शाळांचा समावेश आहे.
तसेच कायम विनाअनुदानित शाळांची मान्यता काढण्यात येणाऱ्यांमध्ये भलावी पब्लिक स्कूल कन्हान, भार्गवी विद्यानिकेतन धानला मौदा, सेंट डॉन वास्को प्राथमिक शाळा मानकापूर, माधुरी कॉन्व्हेंट हुडको कॉलनी, ग्लॉसम कॉन्व्हेंट, वॉशिंग्टन प्राथमिक शाळा, समता प्राथमिक शाळा शेंडेनगर, श्रीराम प्राथमिक शाळा सहकारनगर, एपेक्स कॉन्व्हेंट डबाले लेआऊट, एल.के. खुल्लर हिंदी प्राथमिक शाळा, क्रिसेंट कॉन्व्हेंट गांधीबाग, डॉ. इकबाल कॉन्व्हेंट भालदारपुरा आणि निराला प्राथमिक कॉन्व्हेंट या शाळांची मान्यता काढण्यात आली आहे. या सर्वामध्ये नागपुरातील सर्वात जास्त शाळा आहे. पटसंख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त दाखवून अनुदान घेणाऱ्या शाळांची सर्वात जास्त संख्या नागपुरात आढळून आली आहे. २८ शाळा या नागपूरच्याच आहेत. यावरून किती मोठय़ा प्रमाणात नागपुरात बोगस पद्धतीने शाळा सुरू आहे हे स्पष्ट होते. अशा शाळांची मान्यता काढल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.