जिल्ह्य़ातील ७१ ग्रामपंचायतींच्या ७५० जागांसाठी आज अखेरच्या दिवशी तब्बल ३ हजार ८४२ उमेदवारी अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. २३ डिसेंबरला या निवडणुकीचे मतदान होत असून मतमोजणी लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी आहे.
तालुकानिहाय उमेदवारी अर्जाची संख्या याप्रमाणे- तालुका ग्रामपंचायतींची संख्या, जागा व उमेदवारी अर्ज या क्रमाने. नगर- ६, ५२, २७३. पारनेर-१, ७, २७. शेवगाव-११, ११९, ८२१. नेवासे-७, ७१, ३००. श्रीरामपूर- १२, १४३, ६९२. राहुरी- ५, ५५, २६७. राहाता-८, ९२, ३९९. संगमनेर- ३, ३७, १८८ . कोपरगाव-६, ६२, ३१४ . अकोले- २, १६, २९. कर्जत- १, ९, ५७. श्रीगोंदे- ८, ८८, ४७५.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. उद्या (गुरूवार) छाननी आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ८ डिसेंबर असून त्यानंतर रिंगणात किती उमेदवार राहतात ते स्पष्ट होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3842 application for 71 village panchyat 750 seats