मलकापूर येथे एका अविवाहित तरुणीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी घृणास्पद प्रकार करणाऱ्या व या प्रकारास साथ देणाऱ्या चार नराधमांना गजाआड के ले असले तरी मलकापूर रेल्वेस्थानक व बसस्थानक येथून रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अधिक सुरक्षितता देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लोणार येथील मूळची रहिवासी असलेली एक २२ वर्षीय अविवाहित तरुणी मुंबईच्या वसई परिसरात मोलमजुरीचे काम करते. ती बुलढाणा येथे कारागृहात नोकरीला असलेल्या तिच्या मावशीला भेटण्यासाठी आली होती. बुलढाणा येथून पुन्हा मुंबईला जाण्याकरिता ती तिचे मावसे विजयसिंग रामकुमारसिंग यांच्यासोबत मंगळवारी रात्री ८ वाजता मलकापूर बसस्थानकावर पोहोचली. त्यावेळी तेथील ऑटोचालक सतीश वासुदेव दाणे (२४, रा.माता महाकालीनगर, मलकापूर), रवींद्र पांडूरंग कवळकार (२८, रा.हनुमाननगर, मलकापूर) आणि दिलीप प्रल्हाद उंबरकर (२०, रा.संत ज्ञानेश्वरनगर, मलकापूर) या तिघांनी त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे गाडी असल्याचे सांगितले. रेल्वेस्थानकावर सोडून देण्यासाठी ती तरुणी व तिचा मावसा विजयसिंग हे दोघेही शरद शालीग्राम पाटील (२८, रा.गणवाडी, मलकापूर) यांच्या ऑटोमध्ये बसले. याच ऑटोत सतीश वासुदेव दाणे आणि रवींद्र पांडूरंग कवळकर हेही बसले. मात्र, ऑटोचालकाने ऑटो रेल्वेस्टेशनकडे नेण्याऐवजी हनुमान चौकातून सरळ मुकुंद नगरकडे वेगात नेला. त्यामुळे ही तरुणी आणि विजयसिंग रामकुमारसिंग यांना संशय आला. त्यांनी धावत्या ऑटोमधून उडी मारली. त्यानंतर ऑटोचालक आणि त्याच्यासोबतच्या दोन आरोपींनी विजयसिंग रामकुमारसिंग यांना मारहाण केली. त्यांना जखमी अवस्थेत सोडून आरोपी सतीश दाणे व रवींद्र पांडूरंग कवळकार यांनी या तरुणीला ऑटोत बसवून मुकुंद नगरजवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
ऑटोचालक शरद पाटील हा आरोपींना तेथेच सोडून निघून गेला. विजयसिंग रामकुमारसिंग यांनी ताबडतोब शहर पोलिस ठाणे गाठून घटनेची हकीकत सांगितली. ठाणेदार महेंद्र देशमुख व पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू यांनी नाकाबंदी करून आरोंपींना काही तासातच अटक केली. गुन्ह्य़ात वापरलेला एम.एच.२८ टी ७०४ क्रमांकाचा आणि एक विनाक्रमांकाचा ऑटो, असे दोन ऑटो पोलिसांनी जप्त केले.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी सतीश वासुदेव दाणे, शरद शालीग्राम पाटील, रवींद्र पांडूरंग कवडकार आणि दिलीप प्रल्हाद उंबरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार महेंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक एस.एच.गवारगुरू, पोलिस शिपाई सानप व बोर्डे करीत आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक साळुंखे यांनी तपास कार्यात मार्गदर्शन करून आरोपींना गजाआड करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या घटनेने मलकापुरात खळबळ उडाली असून तेथे महिला असुरक्षित असल्याची भावना बळावली आहे.
तरुणीवर अत्याचार करणाऱ्या चौघांना अटक
मलकापूर येथे एका अविवाहित तरुणीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2014 at 07:32 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 arrested in girl molestation case