नियोजनबद्ध कामकाज आणि प्रभावी कर्जवसुली करून येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने शून्य टक्के एनपीएचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, ४ कोटी ३२ लाखांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. २७६ कोटी ९० लाखांच्या ठेवी, १९२ कोटी ७३ लाखांची कर्जे, १०४ कोटी २४ लाखांची गुंतवणूक, ७ कोटी ७९ लाखांचे भागभांडवल, ३० कोटींहून अधिक स्वनिधी, ४६९ कोटी ६३ लाखांचा एकंदर व्यवसाय अशी बँकेची भक्कम आर्थिक स्थिती असल्याची माहिती जनकल्याणचे अध्यक्ष डॉ. अविनाश गरगटे यांनी दिली. चालू आर्थिक वर्षांत कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून अधिक प्रभावी ग्राहक सेवा देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे महाव्यवस्थापक अनंत जोशी यांनी सांगितले.

Story img Loader