नगर-मनमाड रस्त्यावर अस्तगाव शिवारात अज्ञात चोरटय़ांनी कंटेनर चालकाला अडवून त्याला मारहाण करून ४ कोटी रुपये किमतीच्या सिगारेटच्या बॉक्ससह कंटेनर पळवून नेला होता. चोरीला गेलेल्या सिगारेट अमदाबाद येथे सापडल्या असून, कंटेनरसह आरोपी मात्र फरारी झाला आहे. ही सिगारेटची पाकिटे पोलिसांनी मंगळवारी राहात्याला आणली.
    दि. २३ ऑगस्टला रात्री दीडच्या सुमारास अस्तगाव शिवारात आयटीसी कंपनीचा हा कंटेनर लुटण्यात आला होता. घटनेनंतर चार दिवसांनी वाहतूक व्यावसायिकाने याबाबतची फिर्याद राहाता पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आव्हान राहाता पोलिसांसमोर होते.
     अमदाबाद येथील कडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसीच्या एका गोदामात ही सिगारेटची पाकिटे सापडली. त्यानुसार पोलिसांनी हा माल जप्त करून ताब्यात घेतला. राहाता पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ अमदाबाद येथे गेले होते. मालाचा पंचनामा करून गुजरातमध्ये कंटेनर या लुटारूंचाही तपास घेण्यात आला. मात्र ते सापडले नाहीत. अखेर दोन टेम्पोंमध्ये सिगारेटचे हे ६०० बॉक्स येथे आणण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा