सततच्या पावसामुळे वान प्रकल्प तुडूंब भरू लागला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ६ पैकी ४ दरवाजे रविवारी उघडण्यात आल्याने नदी काठच्या तालुक्यातील १२ गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
तसेच जिल्ह्य़ातील इतरही प्रकल्पांच्या जलपातळीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री, तर सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्य़ात संततधार पाऊस सर्वत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. प्रकल्प परिसरातही हा पाऊस चांगला होत असल्यामुळे जल पातळीत वाढ होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान प्रकल्प सध्या ८० टक्के भरला आहे. येत्या २४ तासात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला, तर प्रकल्पातील जलपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वान प्रकल्पाचे चार दरवाजे काही सें.मी. उघडे करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा