गोरेगाव तालुक्यातील कटंगी ग्रामपंचायतीत २०११-१२ या वर्षांत आमदार फंडातून पांदण व मुरूम रस्त्याच्या कामासाठी ४ लाख १९ हजार ९३७ रुपये मंजूर झालेली रक्कम ग्रामपंचायतच्या सामान्य फंड खाते क्र. ६२५ मध्ये जमा झाली, मात्र ही रक्कम कुठलेही काम न करता सरपंचांची खोटी स्वाक्षरी करून वटविण्यात आल्याची माहिती माजी सरपंच दमयंता रहांगडाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ग्रामपंचायतच्या खाते क्रमांक ६२५ मधून धनादेश क्र. ८७००१० वर माजी सरपंचाची खोटी स्वाक्षरी करून वटविण्यात आला. हा धनादेश नेमका कुणी वटविला व हे काम कोणत्या कंत्राटदाराच्या नावे आहे, याविषयीही माहिती मिळू शकली नाही. कटंगी येथील टामस बघेले ते गौरी बघेले यांच्या शेतापर्यंत मंजूर झालेला पांदण रस्ता व मुरूमाचे काम फक्त कागदावर दाखवून ही रक्कम खोटी स्वाक्षरी करून उचलल्याचा आरोप माजी सरपंचांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विशेष म्हणजे, हे काम याच वर्षी खोटय़ा स्वाक्षरीने रक्कम काढण्याच्या तीन महिन्याआधी तेराव्या वित्त आयोगातून करण्यात आल्याची माहिती दमयंता रहांगडाले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा