नांदेड परिसरात असलेल्या चार सॉ मिलला आग लागून सुमारे २५-३० लाखांचे नुकसान झाले. गांधी चौक पोलीस ठाण्यात या आगीची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. नांदेड रस्त्यावरील स्ट्रेचर ग्राऊंड परिसरात जवळपास ३३ सॉ मिल, तर १०० ते १३० लाकडी अड्डे आहेत. या सॉ मिलमध्ये शॉर्टसर्कीटने आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. यात राजपाल पांचाळ यांच्या सॉ मिलमधील ७ लाख रुपये किमतीचा ९०० घनफूट लाकडी कट साईज माल, दीड लाख रुपये किमतीचा गेज मशीन, रंदा मशीन, सिंगल पाटा मशीन असे एकूण ८ लाख ५० हजार, शेख महंमद महीद यांचे ६ लाख रुपयांचे लाकडी दरवाजे, शेख रहीम दस्तगीर यांचे २ लाख रुपये किमतीचे लाकडी साहित्य व शेड, शेख रज्जाक बशीर यांचे २ लाख रुपये किमतीचे लाकडी साहित्य अशा चार सॉ मिलला आग लागून जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले. आगीत मशीनसह लाकूड जळून खाक झाले. रहीम शेक यांच्या माहितीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात आकस्मित घटना म्हणून नोंद झाली.

Story img Loader