महेश बालभवन व कलाजगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला गणपती आपणच बनवा’ या कार्यशाळेत ४०० मुलांनी सहभाग घेऊन पर्यावणरपूरक मातीचे गणपती बनवले.
महेश बालभवनात झालेल्या या कार्यशाळेत ब्रिटानियाच्या जाहिरातीतील बालकलाकार निहार गिते हादेखील सहभागी झाला होता. कार्यशाळेचे उद्घाटन राजेंद्र मालू यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध चित्र व शिल्पकार प्रमोद कांबळे, राजेंद्र सारडा, शरद झंवर, रामेश्वर मिनियार, मधुसूदन सारडा, कौस्तुभ झंवर, शिल्पकार शुभंकर कांबळे, चित्रकार मोना पंडय़ा आदी या वेळी उपस्थित होते.
प्रमोद कांबळे यांनी या वेळी ‘गणपती कसा बनवावा’ याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. या वेळी ते म्हणाले, पर्यवरणरक्षण, स्वनिर्मितीचा आनंद, कलेची साधना आणि मातीशी असलेले अतूट नाते अशा अनेक गोष्टींचा आनंद या एकाच छंदातून मिळू शकतो. यातूनच पर्यावरण चळवळीशी नाते जोडण्याचा प्रयत्न असून गेली १८ वर्षे तो सुरू आहे. नगरबरोबरच आता नाशिक व पुण्यातही हा उपक्रम प्रभावीपणे सुरू आहे असे कांबळे यांनी सांगितले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी त्यांनी या वेळी माहिती दिली. पर्यावरण व कलाप्रेमींनी त्याला जाणीवपूर्वक चालना द्यावी असे आवाहनही कांबळे यांनी केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा