दुष्काळी सोलापूर जिल्हय़ात उन्हाळय़ात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची धग चांगलीच जाणवत असून, त्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. सोमवारी ४३.१ अंश सेल्सियसपर्यंत उच्चांकी तापमान मोजले गेले.
गेल्या आठवडय़ात तापमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत वाढला असताना अचानकपणे वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तापमानात घट होऊन ३७ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आले होते. परंतु नंतर पुन्हा तापमानाचा पारा वाढत जाऊन तो ४२ अंशापर्यंत नोदविला गेला. सोमवारी त्यात पुन्हा वाढ होऊन तापमानाचा पारा ४३.१ अंश सेल्सियसपर्यंत गेला. सकाळी दहानंतर तापमान वाढत गेल्यामुळे उष्णतेची झळ त्रासदायक वाटत होती. दुपारी उष्णतेने डोके वर काढले होते. त्यामुळे सूर्यनारायण अक्षरश: आग ओकू लागल्याचे चित्र जाणवत होते. दुपारी रस्त्यावरील वाहतूक काहीशी थांबली होती. तीव्र उन्हामुळे अनेकांना घरात किंवा कार्यालयात राहणे पसंत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा