जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सकाळपर्यंत ४३.२४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ९२ मिमी पाऊस सोनपेठ तालुक्यात झाला. सोमवारच्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यातून पाणी वाहिले. हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी मृग नक्षत्रापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जूनमध्येच खरीप पेरण्या आटोपल्या. आजपर्यंत जिल्ह्यात २४७ मिली पाऊस झाला. ९ जुलच्या अपेक्षित पावसापेक्षा ३१ टक्के अधिकचा पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या ३२ टक्के पाऊस झाला असला तरी यलदरी, सिद्धेश्वर या धरणांची पाणीपातळी मृतसाठय़ाच्या वर सरकली नाही. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पूर आला. ढालेगाव बंधाऱ्यातील पाणीपातळीत वाढ झाली. परभणी शहराला पाणीपुरवठा होणारा राहटी येथील बंधाराही भरला.
जिल्ह्यातील कालचा व आजपर्यंतचा पाऊस याप्रमाणे – परभणी ५१ (२०२.८), पालम ३१.३३ (१८६.८६), पूर्णा ४३ (३२२.४), गंगाखेड ५९ (२२०), सोनपेठ ९२ (३८३.५), सेलू ३८ (२२७.३), पाथरी २६ (२५८), जिंतूर २०.८३ (२२०.२), मानवत २८ २०२.५६).