मे महिन्यास प्रारंभ होताच उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. गेले दोन दिवस ४३ अंश सेल्सिअसवर गेलेला पारा सोमवारी आणखी वर चढून ४४वर स्थिरावला. मराठवाडा कृषी विद्यापीठात यंदाचे सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
परभणीचे तापमान मराठवाडय़ात आतापर्यंत सर्वात पुढे राहत आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून ४३ अंशावर तापमान स्थिरावले असताना सोमवारी मात्र त्याच्याही पुढे पाऱ्याने मजल गाठली. सकाळी लवकर उनाहाचा कडाका जाणवू लागतो. रस्ते लवकर निर्मनुष्य होतात. यंदा वैशाख महिना चांगलाच कडक जाण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ वर्षांपूर्वी सन १९८४मध्ये परभणीत सर्वोच्च तापमानाची (४६ अंश सेल्सिअस) नोंद झाली होती. यंदा हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Story img Loader