जकात कराला पर्याय म्हणून शासनाने सुरू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी पुकारलेल्या व्यापार बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससह शहरातील विविध व्यापारी संघटनानी केलेल्या आवाहनाला शहरातील काँग्रेस प्रणित व्यापारी संघटनांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्यामुळे अनेक भागातील दुकाने दुपारनंतर सुरू झाली. दरम्यान आजच्या बंदमुळे ४५० कोटी रुपयाचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी नागपुरात यापूर्वी बंदचे केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता मात्र महाराष्ट्र व्यापार बंदचे आवाहन केल्यानंतर उपराजधानीत मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाइधकाऱ्या अन्य व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी शहरातील इतवारी, गांधीबाग, कपडा मार्केट, सराफा ओळ, महाल, केळीबाग, गोकुळेपेठ, सीताबर्डी, मस्कासाथ,लकडगंज, वर्धमाननगर, सदर, बैरामजी टाऊन, प्रतापनगर, कॉटेनमार्केट, पाचपावली, इंदोरा, सक्करदरा, नंदनवन, मानेवाडा या परिसरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. कळमना बाजार आणि कॉटेन मार्केट काही वेळ सुरू होता मात्र दुपारनंतर बंद करण्यात आला. चिल्लर किराण व्यापारी संघाने या बंदला पाठिंबा घोषित केला होता मात्र शहरातील अनेक दुकाने आज सुरू होती. सीताबर्डी भागातील अनेक प्रतिष्ठाने सकाळच्यावेळी सुरू होती शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली इतवारी किराणा ओळ, सराफा बाजार, सीताबर्डी, गांधीबाग मार्केट आज कडकडीत बंद होते. या भागातील चहाच्या टपऱ्या आणि पानठेले सुद्धा आज बंद ठेवण्यात आल्या.
दुपारी ३ वाजता अग्रेसन भवनमध्ये एलबीटी विरोधी संघर्ष समिती आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची संयुक्तपणे बैठक झाली. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष रमेश मंत्री आणि विद्यमान अध्यक्ष दीपेन अग्रवाल, व्हीआयएचे अध्यक्ष प्रफुल्लभाई दोषी, मुरलीधर सुरजन, राधेश्याम सारडा, नीलेश सूचक, अजय मदान, हेमंत गांधी, सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष किशोर धाराशिवकर आदींची यावेळी भाषणे झाली.ोभा आटोपल्यानंतर अग्रेसन भवनच्या बाहेर व्यापारांनी निदर्शने करीत सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.  

भाजपकडून मूक निषेध
राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक स्वराज्य कर विरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत भारतीय जनता पक्षाने व्हेरायटी चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध केला. शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या या आंगोलनात महापौर अनिल सोले, खासदार अजय संचेती, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, उपमहापौर संदीप जाधव, प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे. संजय भेंडे. प्रमोद पेंडके, बंडू राऊत, श्रीकांत देशपांडे, कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, माया इवनाते, बंटी कुकडे यांच्यासह मोठय़ा संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader