जिल्हा योग संघटना आणि शिशुविहार मराठी माध्यम बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत २८ शाळांमधील ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संघटनेच्या अध्यक्षा डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे विभागीय अध्यक्ष डी. के. कुलकर्णी, दत्तात्रेय काळे, नरेंद्र वाणी, जिल्हा संघटक संजय होळकर, मुख्याध्यापिका मानसी बापट आदी उपस्थित होते. शिशुविहार बालक मंदिर शाळेतील खेळाडूंनी शैलजा पाटील, कविता क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक दाखविले. स्पर्धेतील पहिल्या सहा क्रमांकांना प्रत्येक वयोगटात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या विविध गटांमध्ये श्रावणी मोरे, श्रीराम निफाडे, ओंकार महाले, गार्गी महकरी, शिल्पी सिंग, संग्राम महाले, उद्देश सोनवणे, वर्षां राऊत, वंदना कोरडे यांनी यश मिळविले. ३५ वर्षांपुढील गटात ज्योत्स्ना अहिरे, सुनील ढमाले यांनी यश मिळविले. प्रथम तीन क्रमांकाने विजयी खेळाडूंची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून नाशिक जिल्हा संघ स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहिती संघटनेचे सचिव सुभाष खाटेकर यांनी दिली.
योगासन स्पर्धेत ४५० खेळाडू सहभागी
जिल्हा योग संघटना आणि शिशुविहार मराठी माध्यम बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत २८ शाळांमधील ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-09-2014 at 07:18 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 450 players participated in the yoga tournament