यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून तब्बल ४८ हजार मतदारांची नावे बाद (डिलिटेड) करण्यात आल्याबद्दलची तक्रार भाजपाचे जिल्हाअध्यक्ष राजू डांगे आणि पक्षाच्या विधी आघाडीचे संयोजक विनोद तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर असंख्य मतदारांना एकतर आपले नावच मतदार यादीत आढळले नाही किंवा यादीत नाव होते, पण नावासमोर ‘डिलिटेड’ लिहिलेले होते. त्यामुळे त्यांना मतदान करू देण्यात आले नाही. अनेक मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याकंडे धाव घेऊनही उपयोग झाला नाही. या संदर्भात निवडणूक यंत्रणेकडे चौकशी केली असता सांगण्यात आले की, मतदार यादीतून नावे डिलीट झाल्यानंतर मतदार याद्यांचे जाहीर प्रकाशन करण्यात आले. मतदार जागृती अभियान राबवण्यात आले.
मतदारांनी यादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी आणि नाव नसल्यास नाव नोंदवून घेण्याची जी व्यवस्था केली आहे तिचा लाभ घेऊन नाव समाविष्ट करून घ्यावयास हवे होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारही जागरूक असणे जरुरीचे आहे.
मतदार यादीतून मतदाराचे नाव डिलीट करण्यापूर्वी तुमचे नाव का डिलीट करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस मतदाराला देऊक नसíगक न्यायाचे पालन निवडणूक यंत्रणेने करावयास हवे होते. तसे न करता परस्पर नावे डिलीट करण्याचा आरोप भाजपा नेते राजू डांगे यांनी केला आाहे.
निवडणूक अधिकारीच ‘डिलिटेड’
गंमत तर अशी आहे की, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख हे स्वत मतदान केंद्रावर मतदान करायला गेले तेव्हा त्यांचेही नाव मतदार यादीतून ‘डिलीट’ करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे उच्चपदस्थ अधिकारी असूनही त्यांना मतदान करता आले नाही. ज्याअर्थी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे नाव सुध्दा त्यांना न विचारताच डिलीट होते तेव्हा मतदाराची काय कथा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे. मतदार याद्यांच्या पुनर्रिक्षणाचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले होते आणि त्याने शहानिशा न करता मतदार याद्यांतून अनेकांची नावे डिलीट करून टाकली, असे समजते. याप्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करते, इकडे तक्रारकत्यार्ंचे लक्ष लागले आहे.

Story img Loader