कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी पावसाचा रात्री चांगलाच जोर राहताना दिवसा मात्र, उघडझाप कायम आहे. चालू हंगामातील २० दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसाने कोयना जलाशयात सुमारे साडेअठरा टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाणीसाठा ४९ टीएमसी म्हणजेच साडेसेहेचाळीस टक्क्यांवर गेला आहे. धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाची उघडझाप कायम असून, शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे.
गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात सुमारे १.३० टीएमसीने वाढ झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजता कोयना धराणाची जलपातळी २ हजार १०६ फूट राहताना पाणीसाठी ४८.९४ टीएमसी म्हणजे ४६.५० टक्के आहे. पैकी ४३.६९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. १ जूनपासून धरणात सुमारे १८.५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणात १३ हजार ३२८ क्युसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात होत आहे.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात सरासरी ६६.७५ एकूण १३५५५.७५ पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रातील हेळवाक व नवजा विभाग वगळता उर्वरित १० विभागात १५ एकूण २९७ तर, कराड तालुक्यात ६.०६ एकूण १६४.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात सर्वाधिक ३१ एकूण १३६६, महाबळेश्वर विभागात १३ एकूण १४३९, नवजा विभागात २३ एकूण १३९४, तर सरासरी एकंदर १४१८.०८ मि.मी. पाऊस होताना दिवसभरातील पावसाची सरासरी नोंद २२.३३ मि.मी. झाली आहे. एकंदर पावसात कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर विभागात १४३९ मि.मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक ४७२ मि.मी. तर कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक २४७.७ तर, शेणोली मंडलात सर्वात कमी १२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना सर्वत्र पावसाची उघडझाप राहिल्याचे वृत्त आहे.
कोयनेचा पाणीसाठा ४९ टीएमसी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, कोयनाकाठी पावसाचा रात्री चांगलाच जोर राहताना दिवसा मात्र, उघडझाप कायम आहे.
First published on: 27-06-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 tmc water stock of koyana