बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखविणाऱ्या पाच शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. बोगस पटसंख्या दाखवून शिक्षण विभागाची दिशाभूल करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने शाळांची पटसंख्या नोंदणी करण्यात आली. या पटनोंदणीत जिल्ह्य़ातील १३ शाळांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुपस्थिती असल्याने त्यांची मान्यता रद्द होण्याचे संकेत होते. यातील ५ शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
राज्यात शिक्षण संस्थांकडून बोगस विद्यार्थी दर्शवून त्या आधारे शासनाचे अनुदान लाटले जात आहे. याबाबत २०११ मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. राज्य शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या पटपडताळणीची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेवानी, जि.प. प्राथमिक शाळा जांभळी, जि. प. प्राथमिक शाळा, मुरकुटडोह-१, जि. प. प्राथमिक शाळा, मुरकुटडोह -२, जि. प. प्राथमिक शाळा, दंडारी, जि. प. प्राथमिक शाळा, बोंडराणी, गोंदिया पालिकेची प्राथमिक शाळा माताटोली, अनुदानित खासगी-संजय गांधी प्राथमिक शाळा भद्रुटोला, विना अनुदानित खासगी शाळा- विकास प्राथमिक शाळा मांडोखाल, शंकरलाल अग्रवाल प्राथमिक शाळा, गोिवदपुर-गोंदिया, स्व. बनारसीदास अग्रवाल प्राथमिक शाळा सडक अर्जुनी, कायम विना अनुदानित खासगी शाळा-संस्कार इंग्रजी प्राथमिक शाळा गोंदिया व गुरुकुल कॉन्व्हेंट रतनारा या शाळांची समितीने पटपडताळणी केली असता त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी अनुपस्थित आढळून आले. त्यानुसार संपूर्ण तपासणी केली असता संजय गांधी प्राथमिक शाळा भदुटोला, विकास प्राथमिक शाळा मांडोखोल, शंकरलाल अग्रवाल प्राथमिक शाळा गोिवदपूर, स्व. बनारसीदास अग्रवाल प्राथमिक शाळा, सडक अर्जुनी व गुरुकुल कॉन्व्हेंट रतनारा या ५ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या असल्याचे स्पष्ट झाले. या आधारे शिक्षण विभागाने या पाचही शाळांची मान्यता रद्द केली आहे.
बोगस विद्यार्थी पटसंख्येच्या पाच शाळांची मान्यता रद्द
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखविणाऱ्या पाच शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
First published on: 20-09-2013 at 08:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 schools recognition are cancelled