वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, ५ हजार रूपये सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ३५ लाख रूपयांचे वाटप व डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना सण अग्रीम अशा तडजोडीवर महापालिका कर्मचारी युनियनने गेले काही दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन आज रात्री थांबवले.
उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे यांच्यासमवेत युनियनच्या मागण्यांच्या संदर्भात मनपा कार्यालयात बैठक झाली. आयुक्त विजय कुलकर्णी कार्यालयीन कामासाठी मुंबईला गेले होते, मात्र त्यांनी मोबाईलद्वारे या चर्चेत भाग घेतला व अंतीम शिक्कामोर्तब उठवले. महापौर शीला शिंदे यांनीही याला संमती दिली. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, राधाजी सोनवणे, रोहिदास वैराळ, मुदगल, विजय बोधे, विठ्ठल उमप, देवीचंद घोरपडे हे पदाधिकारी, तसेच प्रशासनाच्या वतीने प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी, लेखा वित्त अधिकारी प्रदीप शेलार, लेखाधिकारी मेश्राम व आस्थापना विभागाचे अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेली बैठक रात्री साडेआठपर्यंत सुरू होती.
प्रशासनाने युनियनसमोर मनपाच्या सर्व आर्थिक बाजू उलगडून दाखवल्या. बोनस, अग्रीम, सानुग्रह अनुदान व वेतन असे सर्व काही एकाच महिन्यात देणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. वेतन व अग्रीम (फेस्टीवल अ‍ॅडव्हान्स, जो पुढे दरमहा कपात करून वसुल केला जातो) देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली. त्याला युनियनने नकार दिला. काहीही तोडगा निघत नसल्याने युनियनचे पदाधिकारी निघून जाण्याच्या तयारीत होते, मात्र उपायुक्त डॉ. डोईफोडे यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले व आयुक्तांबरोबर फोनवर चर्चा करत शेवटी चर्चा यशस्वी केली. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे लगेचच सुरू होईल व अन्य रकमाही वेळेवर अदा करण्यात येतील असे युनियनला सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा