दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय सहायक संचालक बी. के. मिश्रा यांच्या पथकाने ४ ठिकाणी भेटी दिल्या. या वेळी प्रशासनाने पथकाकडे दुष्काळ निवारणासाठी ५ हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला.
पथकाने सकाळी पाडळसिंगी परिसरात जळालेल्या बागा पाहिल्या. बिंदुसरा पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची, आष्टी तालुक्यातील छावण्या व नरेगाची कामे यांची पथकाने पाहणी केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तयार केलेला दुष्काळ निवारणासाठीचा ५ हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला. मागील २ महिन्यांपासून दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरील विविध पथके, मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे यंत्रणा मेटाकुटीला आली आहे.
आतापर्यंत एकाही पथकाच्या पाहणी दौऱ्यानंतर दुष्काळ निवारणासाठी जिल्ह्य़ाच्या पदरात एक छदामही पडला नाही.
त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांचे दुष्काळ पाहणी दौरे म्हणजे पर्यंटन असल्याचाच भास होऊ लागला आहे. जिल्ह्य़ाच्या पदरात काहीच पडणार नसेल तर पथकांच्या पाहणी दौऱ्यांचे सोपस्कार कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader