शिर्डी येथील स्व. दत्तात्रय ठमाजी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात सर्वधर्मिय ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.
शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक अभय शेळके व सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत असलेल्या या विवाह सोहळयाचे हे दहावे वर्ष होते. विवाह सोहळयात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणांहून वऱ्हाडी आले होते. वऱ्हाडींची साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विवाहापुर्वी सर्व वरांची फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातून सजविलेली वहाने, घोडे यावरुन शाही मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी गोरज मुहूर्तावर अत्यंत उत्साही व मंगलमयी वातावरणात मुस्लिम, बौद्ध व हिंदूू धर्मियांचे विवाह संपन्न झाले. यावेळी हभप उद्धव महाराज, हभप देवानंद महाराज, खासदार संजय दिना पाटील, खासदार भाऊसाहेब कांबळे, संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रसाद तनपुरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बिपीन कोल्हे, कल्याण पाटील, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, डॉ.राजेंद्र पिपाडा, डॉ.एकनाथ गोंदकर, आदी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना होणाऱ्या मुलीला शिक्षण, आजारपण व विवाहप्रसंगी अडचण आल्यास ट्रस्टच्यावतीने मदतीचा हात दिला जाईल असे अभय शेळके यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक धनंजय शेळके यांनी केले. सुत्रसंचालन मनिलाल पटेल यांनी कले. विवाह संपन्न झाल्यानंतर या शेळके बंधुनी सपत्नीक कन्यादान केले. सोहळयासाठी शेळके परिवारातील पंतिगराव शेळके, अॅड. शिवाजीराव शेळके, वसंतराव शेळके, डॉ. पंडीत शेळके, महेंद्र शेळके, जितेंद्र शेळके, हर्षवर्धन शेळके विशेष परिश्रम घेतले. अभय शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिर्डीच्या सामुदायिक सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबध्द
शिर्डी येथील स्व. दत्तात्रय ठमाजी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात सर्वधर्मिय ५१ जोडपी विवाहबद्ध झाली.
First published on: 08-02-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 51 cuples get married in shirdi weeding mohotsav