शहरातील सर्वाधिक घनता असलेल्या भागांपैकी एक असलेल्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात वर्षभरात तब्बल ५१२ एमडीआर क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णालयात केवळ मानद डॉक्टरांद्वारे एकच दिवस बाह्य़रुग्ण कक्ष चालवला जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीत बुधवारी उपस्थित करण्यात आला. रुग्णांची अचूक संख्येसह योग्य ते उपचार देण्यासाठी अधिक सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  दोन वर्षांत आधुनिक तपासण्यांमुळे मल्टीड्रग रेझिस्टंट टीबी तसेच एक्स्ट्रीमली ड्रग रेझिस्टंट टीबीचे रुग्ण ओळखण्यास मदत झाली आहे.  तरी अजूनही अनेक रुग्ण उपचारांशिवाय असून त्यांच्यामुळे या आजाराचा प्रसारही वेगात होत आहे. आठवडय़ातून एकदा होत असलेल्या बाह्य़ रुग्ण कक्षात सापडलेल्या ५३२ एमडीआर क्षयरोगाचे रुग्णांपैकी २३६ महिला रुग्ण आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेणाऱ्या पालिकेने या ठिकाणी कोणतीही योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेता रईस शेख यांनी केला. या ठिकाणी आठवडय़ातून एकदा ओपीडी ठेवली असून त्यासाठी मानद डॉक्टरांची नेमणूक केली आहे.

Story img Loader