डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रासाठी ५५ एकर जमिनीच्या खरेदीचा व्यवहार येत्या ३ दिवसांत होऊन ही जागा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने पूर्वीच ५ एकर जागेवर प्रशासकीय इमारत उभारली. आता औद्योगिक विकास मंडळाकडे जागा खरेदीची रक्कम भरल्याने उर्वरित ५५ एकर जागा ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एक कोटी ६२ लाख निधी विज्ञान भवनासाठी मंजूर करण्यात आला. हे विज्ञान भवन उपकेंद्र परिसरात उभारले जाणार आहे.
औद्योगिक विकास मंडळाकडून विद्यापीठाने जागा खरेदी केली. वास्तविक, ही जागा तुळजाभवानी मंदिर ट्रस्टची आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे वर्ग केली आणि एमआयडीसीने विद्यापीठाला जागा हस्तांतरित करताना पूर्ण रक्कम वसूल केली. आर्थिक गुंत्यामुळे उपकेंद्र उभारणीचे काम एवढे दिवस रखडले होते. त्याला आता चालना मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
येणारा अर्थसंकल्प विद्यार्थिकेंद्रित
विद्यापीठाचा येणारा अर्थसंकल्प विद्यार्थिकेंद्रित असणार आहे. या वर्षी एम.फिल, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तके मिळत नाहीत, अशी तक्रार आहे. पुस्तक खरेदीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू असून या वर्षी ९० लाख रक्कम उपलब्ध आहे. पुढील वर्षांत यापेक्षा तिप्पट रक्कम मिळू शकेल. वाचनकक्षासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करून दिल्या जातील, असे कुलसचिव डॉ. माने यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा