गव्याच्या कळपाने केलेल्या धुमाकुळामध्ये देवाळे, हळदी, कांडगाव या परिसरातील सहा व्यक्ती जखमी झाल्या. यामध्ये शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. बिथरलेला एक गवा पळून जात असताना विहिरीत पडून मृत्यू पावला. या घटनेची परिसरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
कोल्हापूर-राधानगरी रोडवर देवाळे गाव आहे. तेथे चांगल्या प्रकारे शेती पिकली जाते. उसाचे पीक मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात गव्यांचा कळप आला असावा. सुमारे सहा गव्यांचा यामध्ये समावेश होता. त्यांना पाहण्यासाठी
ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनक्षेत्रपाल आर. जी. देवळे व सहकारी, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बेग, विलास सुपे यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी, व्हाईट आर्मीच्या पंधरा कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले. जमावाकडून गव्यांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून गवे बिथरले. ते दिशा मिळेल त्या मार्गाने बेभानपणे पळत सुटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा