आर्णी नगरपालिकेच्या शाळांसाठी ६० लाखाचा निधी प्राप्त झाल्याची माहिती उपनगराध्यक्ष व शिक्षण व नियोजन समितीचे सभापती आरीज बेग यांनी एका शैक्षणिक कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलतांना दिली.  
नगर पालिका शाळांच्या हस्तांतरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दत्तरामपूर येथे पालिकेच्या शाळांचे चौथे केंद्र संमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  संध्या चौधरी व अर्चना चांभारे यांनी तयार केलेले हस्तलिखित ‘उदय’ चे प्रकाशन उपनगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, तर संजीवनी राऊत या विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक उपक्रम राबवून त्यांची परिणामकारकता अभ्यासणे या विषयावर निवडश्रेणी प्रशिक्षणात सादर करावयाच्या कृती संशोधन अहवाल या पुस्तकाचे प्रकाशन मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्या हस्ते झाले. मराठी विषयाच्या समांतर शब्द स्पर्धा परीक्षेत प्रथम आल्याबद्दल किशोर बोरगावकर, विष्णू वाघमारे, आशा आदमाने या शिक्षकांना समान गणवेश, मानधनावर शिक्षकांना इंग्रजी शिकविण्याकरिता नियुक्ती व सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे व शासनाकडून नगरपालिकेला ६० लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला असून लोकप्रतिनिधींनी शाळेचा दर्जा उंचाविण्यासाठी पायाभूत सुविधांवर तो खर्च करावा, असा एकमताने निर्णय घेतला, असे स्पष्ट केले. बेग, मानकर, हिरोळे, मडावी, रावते यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. आभार संध्या चौधरी यांनी मानले.

Story img Loader