विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया शाखेच्या वतीने विदर्भ साहित्य संघाचे ६२ वे विदर्भ साहित्य संमेलन येत्या शुक्रवारी गोंदियाच्या विनायकराव कोतवाल सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ७, ८ व ९ डिसेंबरला गोंदियात पुन्हा ५५ वर्षांंनी साहित्यिकांची मांदियाळी बघायला मि ळणार आहे.
यापूर्वी ११ वे विदर्भ साहित्य संमेलन डॉ.वि.भी.कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. त्या संमेलनाला बिहारचे तत्कालिन राज्यपाल लोकनायक बापूजी अणे प्रामुख्याने उपस्थित होते, तर १९५७ ला १९ वे विदर्भ साहित्य संमेलन पुरुषोत्तम दिवाकर उपाख्य बाळासाहेब ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. त्यानंतर तब्बल ५५ वर्षांनी हे साहित्य संमेलन होत असल्याने िहदीबहुल गोंदिया शहरातील मराठी वाचकच नव्हे, तर कवी व साहित्यिकांना एक पर्वणी उपलब्ध होणार आहे. ७ डिसेंबरला ग्रंथिदडीने संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष साकोलीचे आमदार व ओबीसी छावा संग्राम परिषदेचे संस्थापक नाना पटोले आहेत.
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समाक्षक वध्र्याचे डॉ.किशोर सानप असून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांच्यासह विशेष अतिथी म्हणून उषा परम शरण, पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर, पूर्व स्वागताध्यक्ष खासदार भावना गवळी उपस्थित राहणार आहेत. ९ डिसेंबरला साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला पाहुणे म्हणून पालकमंत्री व राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री अनिल देशमुख, मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षां पटेल, आमदार राजेंद्र जैन, आमदार डॉ.खुशाल बोपचे, गोपालदास अग्रवाल, राजकुमार बडोले व छत्तीसगड मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डब्ल्यु.कपूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनातील विशेष आकर्षण म्हणजे उजघाटनाला उपस्थित राहणाऱ्या उषा परम शरण या असतील. ८३ वर्षीय उषा परम शरण िहदी, मराठी व इंग्रजी भाषेतील लेखिका असून वयाच्या २३ व्या वर्षी नर्सने चुकीच्या दिलेल्या औषधाने अंधत्व येऊनही त्यांनी मागे वळून न बघता साहित्य क्षेत्रात केलेले कार्य वाखाणण्यायोग्य आहे. ब्रेललिपीचा अभ्यास करून मराठीतील बहुचíचत ‘सत्यकथा’ या मासिकेत ललित लेखनाला सुरुवात करून या क्षेत्रात नवा ठसा उमटविणाऱ्या उषा यांना जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा या साहित्य संमेलनातून होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष यशवंत सरूळकर यांनी दिली. यावेळी संमेलनाच्या स्वागत समितीचे आमंत्रक माणिक गेडाम, संयोजक प्रदीप व्यवहारे व साहित्यिक प्रा.धनराज ओक उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा